सावरकर प्रतिष्ठानतर्फे  गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:08 IST2018-07-29T23:26:28+5:302018-07-30T00:08:52+5:30

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पंचवटीतील स्मारक हे पर्यटनस्थळ आणि अभ्यास केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी स्मारकात सावरकरांचे साहित्य, त्यांच्या गीतांच्या ध्वनीफिती उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

Savarkar Pratishthan honored by meritorious students | सावरकर प्रतिष्ठानतर्फे  गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सावरकर प्रतिष्ठानतर्फे  गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नाशिक : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पंचवटीतील स्मारक हे पर्यटनस्थळ आणि अभ्यास केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी स्मारकात सावरकरांचे साहित्य, त्यांच्या गीतांच्या ध्वनीफिती उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.  क्रांतिसूर्य सावरकर प्रतिष्ठानतर्फे सावरकर स्मारकात आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्र माप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सानप बोलत होते. विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुकर व्हावे यासाठी महानगरात २४ अभ्यासिका सुरू केल्या.  तुळशीराम गुट्टे महाराज यांनी भाषणात ज्ञानाचा सूर्य उगवला पाहिजे. सावरकरांची विचारसरणी घराघरापर्यंत पोहोचिवण्याचे कार्य होणे गरजेचे आहे, असे सांगितले. महापौर रंजना भानसी ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनीही मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मोहिनी भगरे यांनी
प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली, तर सोमनाथ बोडके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी १००हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमास नगरसेविका भिकुबाई बागुल, पंचवटी प्रभाग सभापती पूनम धनगर, सुरेश खेताडे, रुची कुंभारकर, जगदीश पाटील, पुंडलिक खोडे, सुनीता पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दौडे, पूनम सोनवणे, पंचवटी मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सुनील फरताळे, श्याम पिंपरकर, दिगंबर धुमाळ, हरिकृष्ण सानप, माणिकराव देशमुख, गोविंद अग्रवाल, प्रियांका कानडे, दीपक सावंत, प्रकाश केकाणे, रोहिणी दळवी, प्रवीण अहेर, नीलेश करंदीकर आदी उपस्थित होते.

Web Title: Savarkar Pratishthan honored by meritorious students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक