स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे सावरकर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST2021-05-29T04:12:02+5:302021-05-29T04:12:02+5:30

पंचवटी : भाजप तपोवन मंडळ व युवक मित्रमंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वामी नारायणनगर येथील स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन ...

Savarkar Jayanti celebrations at Swatantryaveer Savarkar Memorial | स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे सावरकर जयंती उत्साहात

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे सावरकर जयंती उत्साहात

पंचवटी : भाजप तपोवन मंडळ व युवक मित्रमंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वामी नारायणनगर येथील स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी चिटणीस प्रशांत जाधव, नगरसेवक सुरेश खेताडे, विभागीय अधिकारी विवेक धांडे, अध्यक्ष दिगंबर धुमाळ, धनंजय पुजारी, संजय संघवी, युवराज झोमान, विजय फड, गायत्री पाठक, निनाद पुजारी, सागर भगत, विशाल पवार, भूषण दराडे, विशाल ठाकूर, अंकित राठोड, मनीष जाधव, विजय पगार उपस्थित होते. उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्राविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन युवक मित्रमंडळाचे अध्यक्ष सोमनाथ बोडके यांनी केले.

===Photopath===

280521\28nsk_11_28052021_13.jpg

===Caption===

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करताना भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे. समवेत राहुल ढिकले,   प्रशांत जाधव, सुरेश खेताडे, विवेक धांडे,  दिगंबर धुमाळ, धनंजय पुजारी, संजय संघवी, युवराज झोमान, विजय फड, गायत्री पाठक, निनाद पुजारी, सागर भगत आदी 

Web Title: Savarkar Jayanti celebrations at Swatantryaveer Savarkar Memorial