सावानाला ‘उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:10 AM2019-11-12T01:10:00+5:302019-11-12T01:10:22+5:30

ग्रंथालय भारती या ग्रंथालय, वाचक, प्रकाशक, कर्मचारी या सर्वांसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारे संस्थेतर्फे अरविंद शंकर नेरकर स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावाना यांना कोल्हापूरचे करवीरनगर वाचन मंदिर येथे सुधीर बोधनकर डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर, हेमंत कुलकर्णी, प्रा. विश्वास नेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 Savannah Award for 'Outstanding Library' | सावानाला ‘उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्कार

सावानाला ‘उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्कार

googlenewsNext

नाशिक : ग्रंथालय भारती या ग्रंथालय, वाचक, प्रकाशक, कर्मचारी या सर्वांसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारे संस्थेतर्फे अरविंद शंकर नेरकर स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार सार्वजनिक वाचनालयनाशिक अर्थात सावाना यांना कोल्हापूरचे करवीरनगर वाचन मंदिर येथे सुधीर बोधनकर डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर, हेमंत कुलकर्णी, प्रा. विश्वास नेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सावानातर्फे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, ग्रंथालय भारतीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि सावानाचे बीएमलीब प्रमुख अ‍ॅड. भानुदास शौचे, बालविभागप्रमुख संजय करंजकर , श्रीकांत बेणी यांनी पुरस्कार स्वीकारला. सावानातर्फे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी सन्मानाबद्दल आभार मानले. अ‍ॅड. शौचे यांनी सावानाचा परिचय करून दिला.

Web Title:  Savannah Award for 'Outstanding Library'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.