सातपूर : तरुणाचा दगडाने ठेचुन खून
By Admin | Updated: March 29, 2017 15:11 IST2017-03-29T15:11:09+5:302017-03-29T15:11:09+5:30
एका 27 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचुन खून केल्याचे उघडकीस आले आहे.

सातपूर : तरुणाचा दगडाने ठेचुन खून
सातपूर :- येथील राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णायाच्या (ईएसआय) आवारात एका 27 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचुन खून केल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत अज्ञात मारेकरीच्या विरोधात सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
$$ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुढीपाडव्याच्या दिवशी दि.28 रोजी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान सातपूर येथील राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णायाच्या (ईएसआय) आवारात दुधाच्या टपरी मागे जयप्रकाश नगर (ईएसआय भिंतीलगत) येथील लक्ष्मण हुलगप्पा विटकर या 27 वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत राजू मुकेश विटकर वय 30 राहणार जयप्रकाश नगर याने सातपूर पोलिसात रीतसर फिर्याद दाखल केली आहे.याबाबत अज्ञात मारेकरीच्या विरोधात सातपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पवार पुढील तपास करीत आहेत.ज्या ठिकाणी या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.त्या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त हजारोंच्या संख्येने रात्री उशिरापर्यंत यात्रेची गर्दी होती.