सातपूर भाग अंधारात, मोदींचे समर्थक नाराज
By Admin | Updated: May 27, 2014 01:20 IST2014-05-27T01:01:59+5:302014-05-27T01:20:58+5:30
सातपूर : सातपूर परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत तो सुरळीत न झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.

सातपूर भाग अंधारात, मोदींचे समर्थक नाराज
सातपूर : सातपूर परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत तो सुरळीत न झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.
सातपूर भागात कॉलनी आणि अन्य परिसरात सायंकाळी पाच वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळाने वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती; परंतु महावितरणकडून कोणतेही समाधानकारक उत्तर दिले जात नव्हते. त्यातच नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याचे दूरचित्रवाहिन्यांवरील प्रक्षेपण पाहण्यासाठी आतुर समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. सातपूरच्या समतानगर येथेच वीज यंत्रणा बिघडल्याने हा प्रकार घडल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. तथापि, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.