सातपूरला महिलेचे मंगळसूत्र खेचले
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-02-29T23:54:55+5:302016-03-01T00:10:22+5:30
सातपूरला महिलेचे मंगळसूत्र खेचले

सातपूरला महिलेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक : दुचाकीवर जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचल्याची घटना रविवारी (दि़२८) सायंकाळी सातपूरच्या शिवाजी चौकात घडली़ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता रवींद्र कणसे (४०, रा़नामस्मृती, न्हावी गल्ली, शिवाजी चौक, सातपूर) या सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच १५, डीएच ५२२३) जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ या प्रकरणी कणसे यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)