प्रतिकूल परिस्थितीतही समाधानकारक अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:45+5:302021-02-05T05:41:45+5:30
अर्थसंकल्पातील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेली तरतूद १३७ टक्के इतकी वाढवण्यात आली आहे. ही रक्कम २.२३ ...

प्रतिकूल परिस्थितीतही समाधानकारक अर्थसंकल्प
अर्थसंकल्पातील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेली तरतूद १३७ टक्के इतकी वाढवण्यात आली आहे. ही रक्कम २.२३ लाख कोटी इतकी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेतील कमतरता भरून काढण्यासाठी काही प्रमाणात या तरतुदीचा उपयोग हेाईल. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी अर्थसंकल्पाचा फोकस हा पायाभूत सुविधांवर भर देण्याचा दिसतो आहे. त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडचरमध्ये ३४ टक्क्यांच्या जवळपास वाढ करून ५.५० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रेल्वेसाठी १ लाख कोटीहून अधिक वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच इतरही काही तरतुदींमुळे पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त करांमध्ये, बँकेच्या धोरणात तसेच निर्गुंतवणूक धेारणात इतर संबंधित क्षेत्रात प्रशासकीय म्हणता येतील असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बदल सुचविण्यात आले आहेत. जे काळानुरूप अपरिहार्य असे म्हणता येतील. असे असले तरी असंघटित क्षेत्रातील रोजगाराची अनिश्चितता बघता त्यासाठी अजून काही ठाेस उपाययोजना करणे आवश्यक होते. तसेच भविष्यकालीन तरतुदी म्हणून ज्या पेंशन योजना लागू करण्यात आलेल्या आहेत. त्याचेही सुसूत्रीकरण करून वयाची अट पूर्ण करू शकत नसल्यामुळे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे जो वर्ग या नियमात बसू शकत नाही त्याला सामावून घेण्यासाठी विशेष तरतूद करणे आवश्यक होते.
एकंदरीतच सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यातल्या त्यात समाधानकारक अर्थसंकल्प असे सर्वसाधारणपणे वर्णन करता येईल.
- तुषार पगार, सनदी लेखापाल, नाशिक