सटाणा : शहराला संजीवनी ठरणाऱ्या सुमारे ५१ कोटी रूपये खर्चाची पुनद पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून १ मे २०२१ पर्यंत महाराष्ट्र दिनी नागरिकांना घरोघरी पुनंद धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पोहचविण्याचा आपला मनोदय असल्याचा सटाणा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी स्पष्ट केले.सटाणा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे अभिवचन निवडणुकीत देण्यात आले होते. नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पुनद पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाॅईंट टू पॉईंट समक्ष पाहणी केली व झालेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मोरे यांच्यासह पालिका प्रशासन अधिकारी, तांत्रिक समिती, तसेच ठेकेदारांच्या उपस्थितीत संपूर्ण योजनेची पाहणी करण्यात आली. पुनद पाणीपुरवठा योजनेंतर्गत सटाणा शहरातील चौगांव बर्डी येथील दोन जलकुंभ उभे करण्यात येत असून त्यांना आवश्यक संरक्षक भिंत उभारण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच शहराअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम देखील जोरदार सुरू असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.१८ किलोमीटर कामाची चाचणी यशस्वीकळवण तालुक्यातील पुनद धरणातून सटाणा शहरासाठी थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या ५१ कोटी रूपयांच्या योजनेने आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. या योजनेतंर्गत जलवाहिनीचे पुनद पासूनचे १८ कि.मी. च्या कामाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असून, येत्या महिन्याअखेरपर्यंत अर्थात जानेवारी २१ पर्यंत सटाणा शहरातील पाणीपुरवठा जलवाहिनीची चाचणी पूर्ण करण्यात येणार आहे.विजेसाठी स्वतंत्र लाईन पुनद येथील जलशुद्धिकरण केंद्राचे कामाने देखील गती घेतली असून, जनतेला स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळावे यासाठी आवश्यक मशिनरी, तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. जलशुद्धिकरणासाठी आवश्यक २४ तास विजेसाठी स्वतंत्र लाईन घेण्यात येणार आहे. जलशुद्धिकरण केंद्रातील तांत्रिक कर्मचारी वर्ग देखील २४ तास उपलब्ध असावा यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सटाणावासीयांना मिळणार महाराष्ट्र दिनी पुनंदचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:24 IST
सटाणा शहराला संजीवनी ठरणाऱ्या सुमारे ५१ कोटी रूपये खर्चाची पुनद पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून १ मे २०२१ पर्यंत महाराष्ट्र दिनी नागरिकांना घरोघरी पुनंद धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पोहचविण्याचा आपला मनोदय असल्याचा सटाणा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी स्पष्ट केले.
सटाणावासीयांना मिळणार महाराष्ट्र दिनी पुनंदचे पाणी
ठळक मुद्देधरणातून थेट जलवाहिनी : पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात