सटाणा : शेतकऱ्यांची उपविभागीय कृ षी अधिकाºयांकडे मागणी सदोष बियाणांमुळे कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:48 IST2018-04-07T00:48:20+5:302018-04-07T00:48:20+5:30

सटाणा : सदोष कांदा बियाण्यामुळे दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला नुसते टोंगळे आले आहेत. उत्पादनात घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

Satana: The demand of the sub-divisional agricultural authority of the farmers due to bad seeds is the loss of onion | सटाणा : शेतकऱ्यांची उपविभागीय कृ षी अधिकाºयांकडे मागणी सदोष बियाणांमुळे कांद्याचे नुकसान

सटाणा : शेतकऱ्यांची उपविभागीय कृ षी अधिकाºयांकडे मागणी सदोष बियाणांमुळे कांद्याचे नुकसान

सटाणा : सदोष कांदा बियाण्यामुळे दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला नुसते टोंगळे आले आहेत. उत्पादनात घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, संबंधित कंपनीने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बागलाण तालुक्यातील पारनेर येथील शेतकरी जालिंदर देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे केली आहे. पारनेर येथील शेतकरी जालिंदर देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. १५ सप्टेंबर २०१७ रोजी एका कंपनीचे कांदा बियाणे वाण खरेदी केले होते. पाचशे ग्रॅम वजनाची सात पाकिटे घेतल्ीे. त्याची रोपे तयार करून ८ डिसेंबर २०१७ रोजी कांद्याची लागवड केली. सुमारे साठ हजार रुपयांचे कांदा पीक उभे केले; मात्र सदोष बियाण्यामुळे त्याला अक्षरश: टोंगळे फुटले आहेत. त्यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशा आशयाची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, देवरे यांच्या तक्रारीची दखल घेत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष कैलास खैरनार, तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस, बियाणे महामंडळाचे डॉ. जे. के. ढेभरे, कृषी अधिकारी प्रणय हिरे यांनी पिकाची पाहणी केली.

Web Title: Satana: The demand of the sub-divisional agricultural authority of the farmers due to bad seeds is the loss of onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा