शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा : छत्रपती शिवरायांनी ज्या बाजारातून केली होती चेतकची खरेदी पर्यटन मंत्रालयाकडून त्या घोडेबाजाराला पर्यटनाची झळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 22:58 IST

राजस्थानमधील पुष्कर मेळ्यातील उंटांच्या बाजाराप्रमाणे असला तरी अद्याप याविषयीच्या माहितीचा प्रचार-प्रसार फारसा झालेला नाही. त्यामुळे सारंगखेडा अश्व बाजाराविषयी अनभिज्ञता अधिक आहे. या सारंगखेड्याला पर्यटनाचे स्वरुप देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पावले उचलली आहे

ठळक मुद्देअनादी काळापासून विविध प्रजातीच्या घोड्यांचा बाजार घोड्यांची सौंदर्य, शर्यत स्पर्धा, नृत्य स्पर्धा. तीन तारखेपासून ‘चेतक फेस्टीवल-२०१७’चे आयोजन चेतक फेस्टीवल पर्यटकांसाठी पर्वणी : विभागीय आयुक्त महेश झगडे

नाशिक : नंदूरबार जिल्ह्यातील तापीच्या खोºयावर वसलेल्या सारंगखेड्यामधील घोडेबाजाराला केंद्र व राज्य सरकारने पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यटन विकास महामंडळाने यासाठी प्रयत्न करत ‘चेतक महोत्सव’ भरविला आहे. हा महोत्सव महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सारंगखेडा या गावात अनादी काळापासून विविध प्रजातीच्या घोड्यांचा बाजार भरतो. हा बाजार राजस्थानमधील पुष्कर मेळ्यातील उंटांच्या बाजाराप्रमाणे असला तरी अद्याप याविषयीच्या माहितीचा प्रचार-प्रसार फारसा झालेला नाही. त्यामुळे सारंगखेडा अश्व बाजाराविषयी अनभिज्ञता अधिक आहे. या सारंगखेड्याला पर्यटनाचे स्वरुप देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पावले उचलली आहे. महामंडळ व चेतक महोत्सव समितीच्या माध्यमातून येथे तीन तारखेपासून ‘चेतक फेस्टीवल-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर झगडे यांनी पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत झगडे यांनी माहिती देताना सांगितले, सारंगखेड्याचा चेतक महोत्सव पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये देशाच्या कानाकोप-यासह विदेशातही पोहचलेला असेल. गुजरातमधील रण महोत्सव, राजस्थानमधील पुष्करचा मेळा याप्रमाणे  ‘चेतक महोत्सव’ नावारुपाला येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटन मंत्रालयाने यादृष्टीने प्रयत्न सुरू केले असून मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत अश्व संग्रहालय इमारतीचे भूमिपूजन गेल्या आठ तारखेला पार पडले. पर्यटकांचा वर्षभर वावर रहावा, यासाठी सारंगखेड्याला अश्व संग्रहालय उभारले जात आहे. रोजगारनिर्मिती आयटी किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये जेवढी गुंतवणूक करु न होत नाही तेवढी गुंतवणूक पर्यटन क्षेत्रात केल्यावर होते, हे डोळ्यापुढे ठेवून ‘चेतक फेस्टिव्हल’ भरविल्याचे झगडे म्हणाले. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे उपस्थित होते. येत्या २ जानेवारी रोजी महोत्सवाची सांगता होणार आहे.घोड्यांची सौंदर्य, शर्यत स्पर्धा, नृत्य स्पर्धा महोत्सवाचे आकर्षण

देश-विदेशातील विविध प्रजातीच्या हजारो घोड्यांचा भरणारा बाजार. यावेळी घोड्यांची सौंदर्य, शर्यत स्पर्धा, नृत्य स्पर्धा. सारंगखेड्यात यंदापासून पर्यटकांसाठी महामंडळाने वातानुकूलित व विनावातानुकूलित तारांकित हॉटेलला लाजविणारे तंबूद्वारे निवास व्यवस्था केली आहे. घोड्यांच्या विविध स्पर्धांसोबत घोडेसफारीची संधी, साहसी क्रिडा प्रकार, तापीच्या पात्रात नौकानयन, आदिवासी लोककलांचे सादरीकरण आदि उपक्रम आयोजित केले आहे.

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिक