शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

नाशकात सराफ बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 14:11 IST

नाशिक सराफ संघटनेने शुक्रवारपासून (दि.२०) सलग तीन दिवस शहर, उपनगरातील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आहे. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणावर या वर्षी कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे

ठळक मुद्देसराफ बाजार सलद तीन दिवसांपासून बंदसर्व सराफी पेढ्यांचा 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनसुरक्षा गस्त वाढविण्याची सराफांकडून मागणी

नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ संघटनेने शुक्रवारपासून (दि.२०) सलग तीन दिवस शहर, उपनगरातील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आहे, परंतु, याकाळात पोलीस प्रशासनाने सराफ बाजारातील गस्त वाढवून व्यावसियांच्या सराफी पेढ्यांना सुरक्षा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणावर या वर्षी कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर अनेक नागरिक सोने खरेदीला प्राधान्य देतात. तर अनेकजण चांदीच्या गुढी, तसेच पूजेते ताट वाटी असे साहित्य खरेदी करतात. परंतु, यावर्र्षी पाडव्याच्या पाच दिवस पूर्वी पासूनच सराफांची सर्व दुकाने बंद असल्याने सराफ बाजारा शुकशुकाट दिसून येत असून  चार दिवसांत सराफ बाजारात जवळपास दोनशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. परंतु, राष्ट्रीय कतव्य म्हणून नाशिक, सिडको, पंचवटी सराफ संघटनांचे १ हजार ४८० सभासद या निर्णयात सहभागी होणार आहेत. सराफ बाजारात सराफी व्यावसायिक अ वर्गात येतात तर कारागीर, जंगम हे घटक ब वर्गात येतात. शहरात एकूण पाच हजार कारागीर असून यात सुमारे दोन हजार पश्चिम बंगालच्या कारागीरांचा समावेश आहेत. या सर्व कारागीरांना बंदच्या काळात एक हजार रुपयांपर्यंतचा किराणा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सराफ व्यावसायिकांनी घेतला आहे.

शहरात गस्ती वाढविण्याची गरजप्रशासनाच्या सूचनेमुळे २० व २१ तारखेला शहर, परिसरातील सर्व सराफी पेढ्यांनी व्यवहार बंद ठेवल्यानंतर रविवारी जनता कर्फ्यूचेही कडेकोट पालन केले. यापुढेही सररारच्या सूचना मिळेपर्यंत व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सराफी पेढ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने शहरात गस्ती वाढविण्याची गरज आहे.  - चेतन राजापूरकर, नाशिक सराफ संघटना 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकjewelleryदागिनेPoliceपोलिस