Saptnik Ganga Pujan performed by Gurumauli | गुरुमाउली यांनी केले सपत्नीक गंगापूजन

गुरुमाउली यांनी केले सपत्नीक गंगापूजन

नाशिक : गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी रविवारी (दि. ३१) सायंकाळी सपत्नीक गंगापूजन केले. श्रीस्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गेल्या पन्नास वर्षांहूनही अधिक काळापासून गंगापूजनाची परंपरा आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून, गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी सपत्नीक गंगापूजन केले. ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध १ ते १० या दहा दिवसांत संपूर्ण भारतवर्षात गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गंगापूजन सोहळा संपन्न होत असतो.
दरवर्षी अखंडपणे हे पूजन केले जाते. गुरुमाउलींनी सृष्टीच्या समृद्धीसाठी तसेच कोरोनाच्या संकटातून सुटका व्हावी यासाठी गंगामातेकडे प्रार्थना केली.

Web Title: Saptnik Ganga Pujan performed by Gurumauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.