श्रीरामनगरच्या सरपंचपदी संपत खताळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:23 IST2019-02-11T13:23:31+5:302019-02-11T13:23:40+5:30
निफाड : तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संपत खताळे तर उपसरपंचपदी संगिता मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

श्रीरामनगरच्या सरपंचपदी संपत खताळे
निफाड : तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संपत खताळे तर उपसरपंचपदी संगिता मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन सरपंच व उपसरपंच निवडीसाठी श्रीरामनगर ग्रामपंचायत कार्यालयात निफाडचे मंडल अधिकारी सोमनाथ खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. श्रीरामनगर ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच भगवान शिंदे व उपसरपंच शिला काळे यांनी अंतर्गत ठरलेल्या रोटेशन पध्दतीने आपल्या पदाचे राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या सरपंच व उपरपंचपदाच्या निवडीसाठी निफाडचे मंडल अधिकारी सोमनाथ खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात बोलविण्यात आली होती.निवडणूक कार्यक्र म पत्रिकेनुसार विहीत मुदतीत सरपंच पदासाठी संपत नाना खताळे यांनी तर उपसरपंच पदासाठी संगिता मधुकर शिंदे यांनीच आपआपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ खैरे यांनी सदरची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली.बिनविरोध निवडीची घोषना होताच उपस्थित समर्थकांनी प्रचंड फटाक्याची आतषबाजी करीत व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भिमराज काळे ,भगवान शिंदे ,ज्ञानेश्वर गाडेकर,शिलाताई काळे ,शोभा शिंदे ,मंदाकिनी हंडोरे ,सांगिता पवार,यांच्यासह कामगार तलाठी शंकर खडांगळे ,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बोरगुडे हे उपस्थित होते. नविनर्वाचित सरपंच,उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला