सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास सुरुवात
By Admin | Updated: March 29, 2015 00:22 IST2015-03-29T00:21:41+5:302015-03-29T00:22:09+5:30
सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास सुरुवात

सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास सुरुवात
कळवण : भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तश्रृंगगड येथे चैत्रोत्सव अतिशय आनंद व भक्तिमय वातावरणात सुरू झाला असून, पहाटे पासून विविध धार्मिक पुजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणुकीसह मिरवणुक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा इ. सुविदेंच्या माध्यमातुन देवस्थान कर्मचारी, महसुल प्रशासन व पोलीस यंत्रणेसह विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत असून यात्रा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. सकाळची महापुजा न्यासाचे विश्वस्त अॅड. शरद अष्टपुत्रे यांचे हस्ते पंचामृत अभिषेकासह महापुजा करण्यात आली.
निफाड येथील न्यायलयाचे न्यायाधीश अे. जी. मोहबे, नाशिक जिल्हा न्यायालयाचे न्यायधीश भागवत, पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश् बन्सल, अन्न व औषधे प्रशासन आयुक्त, नाशिक संजय काळे, अन्कम टॅक्स कमिशनर, नाशिक शहा आदींसह विविध मान्यवरांनी दर्शन गेतले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संपुर्ण प्रशासकीय ढाचा कार्यरत असून भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रा उत्सवाचे लाभ घ्यावा असे आवाहन मा. विश्वस्त मंडलाने आवाहन केले आहे. (वार्ताहर)