ओझरच्या सप्तशृंगी ग्रुपची वृद्धांना मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 15:19 IST2019-01-09T15:18:55+5:302019-01-09T15:19:11+5:30
ओझर :गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून प्रत्येक पौर्णिमेला सप्तशृंगगडावर जाणाऱ्या सप्तशृंगी ग्रुपतर्फे कडाक्याच्या थंडीत बेघर असलेल्या गरजूंना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

ओझरच्या सप्तशृंगी ग्रुपची वृद्धांना मायेची ऊब
ओझर :गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून प्रत्येक पौर्णिमेला सप्तशृंगगडावर जाणाऱ्या सप्तशृंगी ग्रुपतर्फे कडाक्याच्या थंडीत बेघर असलेल्या गरजूंना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. ओझरहून पहाटे निघून आसपासच्या सर्वच गावातील रस्त्यावर झोपलेल्या बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. सर्वच जण पहाटेपासून ओझर, दिक्षी, पिंपळगाव, कसबे सुकेणे, निफाड, कोकणगाव, टाऊनशीप, दहावा मैल, गरवारे पॉर्इंट,आडगाव,वडाळीभोई,खेडगाव,वणी, नांदुरी आदी गावांना भेटी देत सामाजिक कार्य पार पाडत आहे. सदस्यांमध्ये रामनिवास लढ्ढा, विनोद चांडक,प्रवीण लढ्ढा,मुकुंद जाजू, सुभाष शर्मा,सोनल लोया,दादा चांडक, गिरीश ब्यास,पंकज ब्यास,विकास पांडे यांचा समावेश आहे.