शहरातील शाळांनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2016 07:39 IST2016-06-06T22:36:42+5:302016-06-07T07:39:23+5:30

विद्यार्थ्यांची भरारी : बहुतांश इंग्रजी शाळांचा निकाल शंभर टक्के

Sapphire reached by city schools | शहरातील शाळांनी गाठली शंभरी

शहरातील शाळांनी गाठली शंभरी

 नाशिक : दहावीच्या निकालात यंदाही शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी घवघवीत यश संपादन केले आहे. याबरोबरच अनेक मराठी माध्यमांच्या शाळांनीदेखील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली.
शहरातील न्यू ईरा इंग्रजी माध्यम शाळेचा निकाल १०० टक्के लागला. आदिती मुंदडा या विद्यार्थिनीने ९५.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला, तर भुदर सारंग याने ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय तर ओम देशमुख याने ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. शाळेतील ४५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. तर १३४ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
ब्रह्मा व्हॅली
अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली पब्लिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला. अजिंक्य चौधरी या विद्यार्थ्याने ९०.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला, तर देवेश झा याने ९०.४० तर रोहन घुगे याने ९०.२० यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.
व्ही. एन. नाईक
व्ही. एन. शिक्षण प्रसारक संस्थेचा सरासरी निकाल ९४.७४ टक्के इतका लागला. हिंदी माध्यमिक विद्यालय, संत जनार्दन स्वामी विद्यामंदिर, माध्यमिक विद्यामंदिर, चिंचोली, माध्यमिक विद्यालय, पास्ते, शहीद श्रीकांत बोडके विद्यामंदिर, वडझिरे आणि माध्यमिक विद्यामंदिर, देशवंडी या शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. तर माध्यमिक विद्यामंदिर, राणेनगर, माध्यमिक विद्यामंदिर, राजापूर, माध्यमिक विद्यामंदिर, ब्राह्मणवाडे, माध्यमिक विद्यामंदिर, एकलहरे, निऱ्हाळे, माळेदुमाला, बेलगाव हाळे, माळेगाव, वेहेळगाव, नळवाडपाडा, कासारी, दातली, जळगाव, धारणगाव वीर, धुळवाड, पाटोळे आणि शिवरे या शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला.
श्री श्यामलाल गुप्ता विद्यालय
श्री श्यामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.११ टक्के इतका लागला. ७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. २५ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. रिना यादव (९२.८०), विजय यादव (९२.४०) टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. नाशिक हिंदी सभा संस्था संचलित श्री ललिता प्रसाद पोद्दार अकॅडमी या इंग्रजी शाळेचा निकाल १०० टक्के लागला. (प्रतिनिधी)

Web Title: Sapphire reached by city schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.