आहेरखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:54 IST2020-05-30T22:50:40+5:302020-05-30T23:54:49+5:30
आहेरखेडे ग्रुप ग्रामंपचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार यांची बिनविरोध निवड झाली. आहेरखेडे व पिंपळगाव धाबळीया दोन गावांसाठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या सरपंचांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड झाली.

चांदवड तालुक्यातील आसरखेडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार यांच्या निवडीप्रसंगी उपसरपंच शिवाजी आहेर, सदस्य समाधान जामदार, लता कासव, सत्यभामाबाई वनसे, भोलानाथ गांगुर्डे आदी.
चांदवड : तालुक्यातील आहेरखेडे ग्रुप ग्रामंपचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार यांची बिनविरोध निवड झाली. आहेरखेडे व पिंपळगाव धाबळीया दोन गावांसाठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या सरपंचांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून दुगावचे मंडल अधिकारी आर.के. मगर यांनी काम बघितले. त्यांना सहाय्य तलाठी पी.जी. खळेकर व ग्रामसेवक अतुल आढाव यांनी केले. यावेळी उपसरपंच शिवाजी आहेर, ग्रामपंचायत सदस्य समाधान जामदार, लता कासव, सत्यभामाबाई वनसे, भोलानाथ गांगुर्डे उपस्थित होते. नूतन सरपंचाचा सत्कार करण्यात आला.