संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:53 IST2018-02-13T23:08:46+5:302018-02-13T23:53:05+5:30
चांदवड : चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस नांदगाव येथील संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान समितीने प्रथम क्रमांक दिला आहे.

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायत प्रथम
चांदवड : चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस नांदगाव येथील संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान समितीने प्रथम क्रमांक दिला आहे. गावातील विकासकामांची तसेच नावीण्यपूर्ण कामांची पाहणी करून ‘उत्कृष्ट व सुंदर गाव’ अशी शिफारस करून तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे गाव म्हणून राजदेरवाडी गावाची जिल्हास्तरावर शिफारस केली आहे. या समितीने चांदवड तालुक्यातील शिरसाणे, नन्हावे, काळखोडे, उर्धुळ, मंगरुळ या गावांनासुद्धा भेटी दिल्या. राजदेरवाडी गावाचे काम उत्कृष्ट असल्याचे गुण या समितीने देऊन जिल्हा प्रशासनाकडे शिफारस केली आहे. पाहणी समितीत अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी खताळे, विस्तार अधिकारी ढवले, सोनवणे, तुपे, चांदवडचे सहायक गटविकास अधिकारी एन. एन. पाटील, पाटणकर यांचा समावेश होता. या शिफारसीबद्दल चांदवड -देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सयाजी गायकवाड, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, पंचायत समिती सदस्य निर्मला अहेर यांनी स्वागत केले. यावेळी राजदेरवाडीच्या सरपंच सखूबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे, कैलास शिंदे, नंदराज जाधव, दीपक जाधव, जगन यशवंते, ग्रामसेवक बी. पी. सोनवणे, काळू कापडणे, वसंत जाधव आदी उपस्थित होते.