भोंसला महाविद्यालयातर्फे संजीवनी जाधवचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:06 IST2019-04-26T21:05:48+5:302019-04-26T21:06:24+5:30

नाशिक : आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे तीचा सत्कार करण्यात आला.

Sanjivani Jadhav felicitated by Bhonsala College of Engineering | भोंसला महाविद्यालयातर्फे संजीवनी जाधवचा सत्कार

भोंसला महाविद्यालयातर्फे संजीवनी जाधवचा सत्कार

ठळक मुद्देभोंसला परिवारातील विविध खेळाडूंचाही याप्रसंगी सत्कार

नाशिक : आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे तीचा सत्कार करण्यात आला.
महिलांच्या १०००० मीटर प्रकारात तिने हे यश मिळवले. त्याबद्दल शुक्रवारी (दि.२६) सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला सैनिकी महाविद्यालयात संजीवनी व तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी खेळाडूंची प्रवेशद्वारापासून स्वागत मिरवणूक काढण्यात आली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक नितीन अहिरराव यांनी केले. संस्थषचे पदाधिकारी नितीन गर्गे यांच्या हस्ते संजीवनीचा पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे भोंसला परिवारातील विविध खेळाडूंचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, विजयेंद्र्र सिंग आदींची भाषणे झाली. त्यानंतर संजीवनी जाधव तसेच महाविद्यालयाची श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेती विद्यार्थिनी मोनिका आथरे हिने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
आभार प्रदर्शन क्र ीडा शिक्षक निरंजन गायकवाड यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sanjivani Jadhav felicitated by Bhonsala College of Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक