गुंजाळनगरमध्ये स्वच्छतागृहांचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:25 IST2020-02-22T22:42:36+5:302020-02-23T00:25:59+5:30
विंचूर प्रकाशा महामार्गालगत असलेल्या गुंजाळनगर सोसायटी कार्यालयासमोरील स्वच्छतागृह परिसरातील अस्वच्छता. देवळा/गुंजाळनगर : येथे विंचूर प्रकाशा महामार्गालगत असलेल्या सार्वजनिक ...

गुंजाळनगरमध्ये स्वच्छतागृहांचा बोजवारा
विंचूर प्रकाशा महामार्गालगत असलेल्या गुंजाळनगर सोसायटी कार्यालयासमोरील स्वच्छतागृह परिसरातील अस्वच्छता.
देवळा/गुंजाळनगर : येथे विंचूर प्रकाशा महामार्गालगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता होत नसल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. यामुळे या स्वच्छतागृहांची नियमितपणे साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत देशभरात स्वच्छतेचा जागर केला जात आहे. गुंजाळनगर येथे तीन सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत, परंतु त्यांची दुरवस्था झाली आहे. गुंजाळनगर येथे विंचूर प्रकाशा महामार्गालगत गुंजाळनगर विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यालय असून, समोरच एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. रस्त्याने जाणारे पादचारी, तसेच परिसरातील व्यावसायिक व नागरिक या स्वच्छतागृहांचा वापर करतात. या स्वच्छतागृहांची साफसफाई केली जात नाही. यामुळे तेथे अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांना नाकाला रु माल लावूनच स्वच्छतागृहात जावे लागते. जवळपास दुसरे स्वच्छतागृह नसल्यामुळे नाईलाजाने या स्वच्छतागृहांचा नागरिकांना वापर करावा लागतो.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
स्वच्छतागृहासमोरच असलेल्या सोसायटी कार्यालयाचा परिसरदेखील झाडाझुडपांनी वेढलेला असून, आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या झाडाझुडपातूनच मार्ग काढत असतानाच स्वच्छतागृहातून येणारी दुर्गंधी सहन करावी लागते. ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तक्र ार आहे.
सदरचे स्वच्छतागृह दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली होती. कालांतराने ग्रामपंचायतीने या स्वच्छतागृहांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले. यामुळे हे स्वच्छतागृह दुर्गंधीचे आगर बनले आहे. ग्रामपंचायतीने या स्वच्छतागृहांची नियमितपणे स्वच्छता करावी.
- अमोल गुंजाळ, व्यावसायिक, गुंजाळनगर