जायखेड्याला सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:12 IST2020-04-07T23:12:00+5:302020-04-07T23:12:17+5:30
कोरोनापासून रक्षण होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याची गरज लक्षात घेऊन जायखेडा ग्रामपंचायतीकडून गावात व जवळच्या वस्त्यांवर साबण व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

जायखेड्याला सॅनिटायझरचे वाटप
जायखेडा : कोरोनापासून रक्षण होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याची गरज लक्षात घेऊन जायखेडा ग्रामपंचायतीकडून गावात व जवळच्या वस्त्यांवर साबण व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांना वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याबरोबरच सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.