जळगाव नेऊर येथे स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:12 IST2020-03-25T23:11:40+5:302020-03-25T23:12:01+5:30

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जळगाव नेऊर येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून जंतुनाशक फवारणी केली असून, स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गावात परगावातून येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

Sanitation campaign at Jalgaon Neur | जळगाव नेऊर येथे स्वच्छता मोहीम

जळगाव नेऊर येथे स्वच्छता मोहीम

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जळगाव नेऊर येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून जंतुनाशक फवारणी केली असून, स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गावात परगावातून येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. गावात अनेक ठिकाणी गर्दी होते म्हणून ग्रामपंचायतकडून गेल्या दोन दिवसांपासून ध्वनिक्षेपकद्वारे जाहीर सूचना देण्यात येत आहे. तसेच कोणी रस्त्यावर टोळक्याने दिसल्यास ग्रामपंचायत प्रशासन संबंधित ठिकाणी जाऊन, लोकांना घरात बसण्याचे आवाहन करत आहे. जंतुनाशक फवारणीप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, पोलीसमित्र प्रकाश शिंदे, आरोग्यसेवक मंगेश गांगुर्डे, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, भाऊसाहेब शिंदे, गोरख वाघ, सोपान वाघ, दत्तू तिपायले, शांताराम शिंदे, राधाकृष्ण कुराडे, भिवचंद राऊत उपस्थित होते.

Web Title: Sanitation campaign at Jalgaon Neur