फिक्कीच्या अध्यक्षपदी संदीप सोमाणी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:14 IST2019-01-19T01:13:36+5:302019-01-19T01:14:21+5:30

फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी ख्यातनाम सोमाणी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा संदीप सोमाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय कार्यकारी संचालक तथा सुप्रसिद्ध उद्योजक नंदेश यंदे यांनी दिली.

Sandeep Somani is the President of FICCI | फिक्कीच्या अध्यक्षपदी संदीप सोमाणी यांची निवड

फिक्कीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संदीप सोमाणी व मान्यवर.

नाशिक : फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी ख्यातनाम सोमाणी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा संदीप सोमाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय कार्यकारी संचालक तथा सुप्रसिद्ध उद्योजक नंदेश यंदे यांनी दिली.
नवी दिल्लीमधील प्रवासी भारतीय केंद्रामध्ये सदर सभा घेण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते सभेस प्रारंभ आला. सध्या भारत ही जगातील दखलपात्र आर्थिक महासत्ता असून लवकरच चौथे स्थान प्राप्त होणार असल्याचा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पायाभूत सुविधांच्या अद्ययावती करणासाठी केंद्र सरकार वचनबध्द असून फिक्कीने त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मावळते अध्यक्ष रमेश शाह यांनी गत वर्षातील संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी फिक्कीच्या उपाध्यक्ष व अपोलो समुहाच्या एमडी संगीता रेड्डी,राष्ट्रीय कार्यकारी संचालक तथा नाशिकचे सुप्रसिध्द उद्योजक नंदेश यंदे यांच्यासह देशभरातील उद्योजकांचा समावेश होता. (वा़प्ऱ)

Web Title: Sandeep Somani is the President of FICCI