सटाण्यासाठी तीन कोटींचे क्रीडा संकुल मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:18 IST2021-07-07T04:18:00+5:302021-07-07T04:18:00+5:30

यासंदर्भात बोलताना नगराध्यक्ष मोरे म्हणाले की, सटाणा शहरातील जनतेसह युवक-युवतींना खेळ, व्यायाम व कसरतींसाठी खुले मैदान नाही, परिणामी ...

Sanctioned Rs 3 crore sports package for Satana | सटाण्यासाठी तीन कोटींचे क्रीडा संकुल मंजूर

सटाण्यासाठी तीन कोटींचे क्रीडा संकुल मंजूर

यासंदर्भात बोलताना नगराध्यक्ष मोरे म्हणाले की, सटाणा शहरातील जनतेसह युवक-युवतींना खेळ, व्यायाम व कसरतींसाठी खुले मैदान नाही, परिणामी या गंभीर बाबीला नजरेसमोर ठेवून नगर परिषदेने शहरातील मालेगाव रोड परिसरातील सर्व्हे नं. ३८० मधील ९३२० चौ. मी. क्षेत्रासाठी ३ कोटी ७० लक्ष रुपये मोजले आहेत. त्यात राज्य शासनाने ९० टक्के रक्कम अर्थात २ कोटी ८२ लक्ष १५ हजार ८९१ रुपयांचा निधी शासनाने दिला असून नगरपरिषदेने १० टक्के रकमेचा ६२ लक्ष ७९ हजार ९५६ रुपये इतका भार उचलला आहे.

सटाणा नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच राज्य शासनाच्या वतीने जमीन खरेदीसाठी ९० टक्के रक्कम प्राप्त झाली आहे.

या क्रीडा संकुलात क्रिकेट, २०० मीटर रनिंग ट्रॅक, स्विमींग पूल, बॅडमिंटन यासारख्या मैदानी खेळांसाठी उपयोग होणार आहे. या क्रीडांगणामुळे सटाणा शहराच्या वैभवात भर पडेल. हे क्रीडांगण उभारणी करताना मान्यवर क्रीडा शिक्षकांचे मत जाणून अद्ययावत सुसज्ज क्रीडा संकुल उभारणीसाठी उत्तम दर्जाच्या वास्तुविशारदांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, गटनेते राकेश खैरनार, महेश देवरे, काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती राहुल पाटील, संगीता देवरे, शमा मन्सुुरी, सुवर्णा नंदाळे, नगरसेवक बाळू बागुल, सुनीता मोरकर, पुष्पा सूर्यवंशी, सोनाली बैताडे, निर्मला भदाणे, आरिफ शेख, आशा भामरे, रुपाली सोनवणे, भारती सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, शमीम मुल्ला, डॉ. विद्या सोनवणे, मनोहर देवरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.

Web Title: Sanctioned Rs 3 crore sports package for Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.