सासºयाचा खून, जावई ताब्यात सिन्नर : साडेचार वर्षांनंतर संशयिताला पकडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:31 AM2018-02-28T00:31:45+5:302018-02-28T00:31:45+5:30

सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये घडली होती.

Sana's murder, son-in-law, Sinnar: Seven years after the arrest of the suspect | सासºयाचा खून, जावई ताब्यात सिन्नर : साडेचार वर्षांनंतर संशयिताला पकडण्यात यश

सासºयाचा खून, जावई ताब्यात सिन्नर : साडेचार वर्षांनंतर संशयिताला पकडण्यात यश

Next

सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये घडली होती. तेव्हापासून संशयित फरार होता. या प्रकरणातील संशयित जावई सुमारे साडेचार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. सासºयाचा खून करणाºया संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कर्मचाºयांनी शेतमजूर व मेंढपाळाचा पेहराव धारण करून चांदवड तालुक्यातील बोपाने येथे छापा टाकून अटक केली. सदर गुन्हा घडल्यापासून संशयित सोमनाथ फुलाजी मोरे, रा. खंबाळे, ता. सिन्नर हा नंदुरबार जिल्ह्णात तसेच नाशिक जिल्ह्णात वेगवेगळ्या ठिकाणी नाव बदलून राहत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदवड तालुक्यातील बोपाने गावातून त्यास ताब्यात घेतले. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे एका शेतकºयाकडे सालकरी म्हणून काम करणाºया मयत आत्माराम नामदेव सूर्यवंशी यास नऊ मुली व मुलगा आहे. सूर्यवंशी कुटुंबीय मूळ संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथील असून, गेल्या काही वर्षापासून ते मजुरी काम करताना २०१३ साली नांदूरशिंगोटे शिवारात वास्तव्यास होते. सूर्यवंशी यांची एक मुलगी सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील सोमनाथ मोरे याला दिली होती. तथापि, सोमनाथ सदर मुलीस त्रास देत होता. त्यामुळे मुलगी सूर्यवंशी यांच्याकडे नांदूरशिंगोटे येथे होती. त्यांचा जावई सोमनाथ मोरे पत्नीला घेण्यासाठी नांदूरशिंगोटे येथे सूर्यवंशी यांच्याकडे आला होता. त्यावेळी सासरे सूर्यवंशी यांनी मुलीला जावयासोबत पाठविण्यास नकार दिला.
त्यावेळी सासरा व जावई यांच्या शाब्दिक चकमक झाली होती. यात सासºयाने जावयाच्या थापड मारली होती. यावेळी जावई सोमनाथ त्याचा साडू विजय बर्डे यांच्यासमक्ष याने सासरे सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी सासरे आत्माराम नामदेव सूर्यवंशी (५५) यांचा मृतदेह बाजरीच्या शेतात आढळून आला. यावेळी अर्धा तासापूर्वी त्यांचा जावई सोमनाथ याला तेथून जाताना पाहिले होता. त्यामुळे सोमनाथ फुलाजी मोरे याने अज्ञात हत्याराने वार करून सूर्यवंशी यांचा खून केल्याची फिर्याद विजय बर्डे यांनी दिली होती. त्याप्रमाणे निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, हवालदार प्रकाश चव्हाणके, रवी वानखेडे, दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, किरण काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने चांदवड तालुक्यात बोपाने येथे वास्तव्यास असलेल्या संशयितास अटक करून वावी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Sana's murder, son-in-law, Sinnar: Seven years after the arrest of the suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी