शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

समृद्धी महामार्ग: नागपूर-ठाणे आता ८ तासांत! ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा आज होणार खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:30 IST

इगतपुरी ते आमने या ७६ किमीच्या डोंगराळ भागात ‘समृद्धी’वर पाच बोगदे आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, घोटी (नाशिक) : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा गुरुवारी इगतपुरी येथे समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कोनशिला अनावरण व मुंबई मार्गिका बोगद्याच्या प्रवेशस्थळी फीत कापून दुपारी १२ वाजता उद्घाटन होणार आहे. १२:३५ वाजता समृद्धी महामार्गाची चित्रफीत दाखविली जाणार असून, १२:४० वाजता ठाणे खाडी पूल क्रमांक ३ दक्षिण वाहिनी मार्गिकेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता अडीच वर्षांनी संपूर्ण महामार्ग सेवेत येत आहे. नागपूरहून वाहनांना १२० किमी वेगाने मुंबईच्या वेशीवर ८ तासांत पोहोचता येईल.

पंतप्रधान मोदी यांनी केले होते लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकणमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर २० इंटरचेंजदरम्यान एकूण ८० किमी लांबीचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरीपर्यंतच्या २५ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण दि. ४ मार्च २०२४ रोजी तत्कालीन बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले होते. एकूण ७०१ किमीपैकी ६२५ किमी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू आहे. आता, या महामार्गाचा उर्वरित ७६ किमी लांबीचा मार्ग (इगतपुरी ते आमणे) वाहतुकीस गुरुवारी खुला होणार आहे.

सर्वांत मोठा बोगदा

इगतपुरी ते आमने या ७६ किमीच्या डोंगराळ भागात ‘समृद्धी’वर पाच बोगदे आहेत. त्यांची एकत्रित लांबी ११ किमी आहे. त्यात इगतपुरी येथील ७.७८ किमीच्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आठ मिनिटांमध्ये कापता येईल. या भागात ११ किमीचे दुहेरी व्हायडक्ट उभारण्यात आले आहेत. अवघड असा ८४ मीटर उंचीचा पूल उभारला आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गthaneठाणेnagpurनागपूर