शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

आंबा प्रकरणी संभाजी भिडे यांना जामीन मंजूर ; १७ डिसेंबरला पुढील सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 2:26 PM

आपल्या शेतातील आंबे खाल्याने मुलेच होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या प्रकरणात हिंदुत्वावादी संघटना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी ऊर्फ मनोहर भिडे गुरुजी यांना नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी (दि.७) जामीन मंजूर केला. पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यासह न्यायालयाच्या आदेशानुसार हजर राहण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आल्याचे भिडे गुरुजींचे वकील अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी(दि. १४) होणार आहे. 

ठळक मुद्देआंबा प्रकरणात भिडे गुरुजींना जामीन पंधरा हजारांच्या रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर न्यायलयाच्या आदेशानुसार हजर राहावे लागणार

नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्याने मुलेच होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या प्रकरणात हिंदुत्वावादी संघटना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी ऊर्फ मनोहर भिडे गुरुजी यांना नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी (दि.७) जामीन मंजूर केला. पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यासह न्यायालयाच्या आदेशानुसार हजर राहण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आल्याचे भिडे गुरुजींचे वकील अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी(दि. १४) होणार आहे. नाशिक महापालिकेने केलेल्या याचिकेतील कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सत्र न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्याने तर शुक्रवारी भिडे गुरुजी नाशिकमधील न्यायालयात हजर झाले होते. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. रेशमा जाधव यांनी भिडे गुरुजी यांचे वक्तव्य गंभीर स्वरुपाचे असून गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन करणारे व अंधश्रद्धा पसरविणारे  आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाला धक्का पोहोचविणारे असल्याचा युक्तीवाद करतानाच त्याचा समाजात गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त करीत भिडे गुरुजींचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंत न्यायालयाला केली. परंतु, भिडे गुरुजींच्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढल्या गेल्याचा दावा करीत प्रथम दर्शनी अशाप्रकारचा कुठलाही गुन्हा घडल्याचे स्पष्ट होत  नसल्याचा दावा करीत बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी भिडे गुरुजी यांना जामीन मिळण्याची विनंती न्यायालयाला केली. तसेच भिडे गुरुजी यांची प्रकृती उतार वयामुळे अस्वस्थ्य राहत असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळवी अशीही विनंती न्यायालयाला केली. परंतु, न्यायमूर्ती जगदीश पांडे यांच्या न्यायालयाने भिडे गुरुजींना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळण्याच्या विनंतीवर न्यायाललयाने निर्णय राखून ठेवला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढील सुनावणीला भिडे गुरुजींना हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी के ल्याने पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

काय आहे आंबा प्रकरण?नाशिकमधील १० जून २०१८ रोजी झालेल्या सभेत माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलगाच होतो, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते़ याबाबत ‘लेक लाडकी अभियान’तर्फे  आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीस तथ्य आढळून आल्याने त्यांनी संभाजी भिडे यांना नोटीस बजावून चौकशीस हजर राहण्यास सांगितले़ मात्र, भिडे गुरुजींकडून नोटीस स्वीकारण्यात आली नसल्याने व चे चौकशीलाही उपस्थित न राहिल्याने महापालिकेने नाशिकच्या जिल्हा न्यायालयात भिडे गुरुजींविरोधात खटला दाखल केलेला आहे.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीNashikनाशिकCourtन्यायालयMangoआंबाadvocateवकिल