नाशिकमधील मदरशांमध्ये तिरंग्याला सलामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 13:20 IST2017-08-15T13:20:05+5:302017-08-15T13:20:38+5:30
देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. नाशिकमधील मदरशांमध्येदेखील राष्ट्रध्वज सन्मानाने व अभिमानाने फडकण्यात आले.

नाशिकमधील मदरशांमध्ये तिरंग्याला सलामी
नाशिक, दि. 15 - देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. नाशिकमधील मदरशांमध्येदेखील राष्ट्रध्वज सन्मानाने व अभिमानाने फडकण्यात आले. मशिदीचे मुख्य इमाम धर्मगुरुंनी ध्वजारोहण केले. यावेळी मदरशांमधील विद्यार्थी पारंपरिक पोशाख परिधान करुन ध्वजारोहणासाठी हजर राहिले होते.
यावेळी राष्ट्रगीताचे सादरीकरण झाल्यानंतर विविध उर्दू कवींनी रचलेल्या उर्दू देशभक्तीपर कविताही सादर करण्यात आल्या. वडाळा गाव येथील जामा गौसिया मशिदीच्या प्रवेशद्वारावर मदरसा दारूलउलूम गौसिया फैझान-ए-मदारच्या विद्यार्थ्यांनीही तिरंग्याला अभिवादन केले. यावेळी धर्मगुरु जुनेद आलम यांनी ध्वजारोहण केले. देशाची एकता, प्रगती व संरक्षणासाठी सामूहिक दुवा करण्यात आली. तसेच दहशतवादी संघटनांचा निषेधही नोंदवला गेला. येथील अशरफ रस्त्यावरील अल अशरफ मदरसा येथेही ध्वजारोहण करण्यात आले.