रेमडेसिविरची विक्री; तरुणावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST2021-05-11T04:15:38+5:302021-05-11T04:15:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क निफाड : दोन रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना निफाड पोलिसांनी शिवरे येथील ...

Sale of remedivir; Crime filed against the youth | रेमडेसिविरची विक्री; तरुणावर गुन्हा दाखल

रेमडेसिविरची विक्री; तरुणावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

निफाड : दोन रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना निफाड पोलिसांनी शिवरे येथील एका तरुणाला अटक केली आहे. त्याला निफाड न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.

याबाबत निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरे येथील संशयित राहुल खंडू सानप हा रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी (दि. ८) दुपारी ३च्या दरम्यान निफाड येथील शांतीनगर चौफुली येथे २ रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेत अटक केली होती.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक डॉ. नितीन देवरे यांच्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाण्यात संशयित राहुल सानप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी माळी याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Sale of remedivir; Crime filed against the youth