केएसबी पंप्स कारखान्यात १३ हजार ६०१ रूपयांचा वेतनवाढीचा करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:55 IST2019-02-05T17:54:56+5:302019-02-05T17:55:13+5:30
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील केएसबी पंप्स कारखान्यात २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे १३ हजार ६०१ रूपयांचा भरघोस वेतनवाढीचा करार यशस्वी झाला आहे.

केएसबी पंप्स कारखान्यात १३ हजार ६०१ रूपयांचा वेतनवाढीचा करार
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील केएसबी पंप्स कारखान्यात २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे १३ हजार ६०१ रूपयांचा भरघोस वेतनवाढीचा करार यशस्वी झाला आहे. सिन्नरच्या औद्योगिक विश्वातील हा सर्वाधिक रकमेचा वेतनवाढीचा करार असून इतर कंपन्यांपुढे केएसबीने आदर्श ठेवला आहे.
कामगार युनियनचे अध्यक्ष किरण भाटजिरे व युनियन कमिटीने सोमवारी (दि. ४) या कराराची घोषणा केली. याशिवाय कामगारांसाठी अनेक लाभाच्या योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. २५ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कामगारास २५ ग्रॅम सोने, रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय मोठ्या आजारास कामगारांसाठी दोन लाखांची मदत, मयत कामगारांच्या वारसांना ८० हजारांची रोख मदत, कँटीनला जेवणात सफरचंद, वाढीव एक रजा, प्रत्येक वर्षाला ३० कामगारांना प्रत्येकी एक लाख रूपये गृहकर्जाची तरतूद, प्रति वर्षात १३ कामगारांना एक लाख रूपये शैक्षणिक कर्ज, वेल्फेअर योजनेची अंमलबजावणी, मेडिक्लेम पॉलिसीमध्ये पाच लाख रूपयांची वाढ, युनिफॉर्ममध्ये एक टी शर्टचा समावेश, स्वेटरऐवजी जर्किन बदल, कामगार आउट स्टेशन भत्यात वाढ आदी या कराराचे वैशिष्ट्य आहेत. याशिवाय खेळामध्ये कामगारांच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले.