मुख्याध्यापकांना लवकरच वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 08:34 PM2020-07-09T20:34:03+5:302020-07-10T00:25:53+5:30

सिन्नर : मुख्याध्यापकांना वेतनवाढी साठी संस्था चालक वेठीस धरत असेल तर शिक्षणाधिकारी वेतन वाढ देतील अशी ग्वाही माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी दिली.

Salary hike to principals soon | मुख्याध्यापकांना लवकरच वेतनवाढ

मुख्याध्यापकांना लवकरच वेतनवाढ

Next

सिन्नर : मुख्याध्यापकांना वेतनवाढी साठी संस्था चालक वेठीस धरत असेल तर शिक्षणाधिकारी वेतन वाढ देतील अशी ग्वाही माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या मोजक्याच पदाधिका-यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिक्षकांना वार्षिक वेतन वाढ देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात यावेत आणि त्यासाठी शिक्षणसंस्थेच्या ठरावाची अट रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बैठकीस माणिक मढवई, आशा पवार, बी. के. शेवाळे, डॉ संगीता बाफणा, बाबासाहेब खरोटे, मनोज वाकचौरे, सोमनाथ जगदाळे, पुरुषोत्तम रकिबे, सचिन दिवे, संजय जाधव, आर. एल. चिने, एन. वाय. पगार, एच. एम. खरोटे, पी. के. भाबड, दशरथ जारस, खरोटे आदी मुख्याध्यापक व जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.
----------------------
शिक्षकेतर पदांना मान्यतेची मागणी
शालार्थ आयडीचे रखडलेले प्रस्ताव, डी एड ते बी एड मान्यता प्रस्ताव,
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी मंजुरी, सेवा निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव, रिक्त पदावरील, बढतीचे व मुख्याध्यापक बदलीचे प्रस्ताव मंजुर करणे, शिक्षकेत्तर पदांना मान्यता देणे, प्लॅन मधील शाळा व तुकड्यांचे वेतन नॉन फ्लॅनमध्ये समाविष्ट करणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने आॅनलाइन अभ्यासक्रम कमी करणे, अनुकंपा तत्वा वरती भरतीस मान्यता देणे यासह विविध मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. या मागण्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी प्रविण पाटील यांनी दिले.
-----------------
शालार्थ आयडीचे रखडलेले प्रस्ताव मार्गी लावण्याबरोबरच जिल्ह्णातील शिक्षकांना नियमानुसार देय असलेली हक्काची वार्षिक वेतन वाढ मंजुरीसाठी बहुसंख्य शिक्षणसंस्था चालकांकडून शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याची तक्रार जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांच्याकडे करण्यात आली.

Web Title: Salary hike to principals soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक