आशा सेविकांचे विविध मागण्यांसाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:48+5:302021-06-20T04:11:48+5:30
कळवण - कोरोना प्रादुर्भाव काळात काम करणारे आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचारी व इतरांना दरमहा पाच हजारांपेक्षा अधिक प्रोत्साहन भत्ता दिला ...

आशा सेविकांचे विविध मागण्यांसाठी साकडे
कळवण -
कोरोना प्रादुर्भाव काळात काम करणारे आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचारी व इतरांना दरमहा पाच हजारांपेक्षा अधिक प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे, तर अल्प मानधनावर कार्यरत आशा व गटप्रवर्तकांना का नाही, असा सवाल करीत शासनाने आमच्या मागण्या मंजूर करून न्याय द्यावा, याबाबत विविध मागण्यांचे निवेदन आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले. संघटनेच्या योगीता शेवाळे, यमुना पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी डी. ई. जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांची भेट घेऊन निवेदन देत मागण्यांकडे लक्ष वेधले.
-------------
कळवण येथे गटविकास अधिकारी डी. ई. जाधव यांना निवेदन देताना योगीता शेवाळे, यमुना पवार आदी. (१९ कळवण २)
===Photopath===
190621\19nsk_2_19062021_13.jpg
===Caption===
१९ कळवण २