चिचोंडी-बदापूर रस्ता दुरुस्तीसाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:18 IST2021-06-16T04:18:23+5:302021-06-16T04:18:23+5:30

येवला दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री भुजबळ यांची संपर्क कार्यालयात भेट घेऊन सदर निवेदन देण्यात आले. चिचोंडी एमआयडीसी ते बदापूर रस्त्याची ...

Sakade for repairing Chichondi-Badapur road | चिचोंडी-बदापूर रस्ता दुरुस्तीसाठी साकडे

चिचोंडी-बदापूर रस्ता दुरुस्तीसाठी साकडे

येवला दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री भुजबळ यांची संपर्क कार्यालयात भेट घेऊन सदर निवेदन देण्यात आले. चिचोंडी एमआयडीसी ते बदापूर रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. कोपरगावकडे जाण्यासाठी चिचोंडी, सातळी येथील नागरिकांना बदापूरमार्गे जवळचा सदर रस्ता आहे. परिसरातील वाहने, नागरिक या रस्त्याने ये-जा करत असतात तसेच शेतमालही याच रस्त्याने मार्केटला घेऊन जावे लागते. खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह सर्वांचीच मोठी गैरसोय होत असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.

सदर रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर बदापूर येथील सामजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मोरे, कलीम पठाण, संदेश मुटकुळे, गणेश जगताप, रमेश मोरे, सौरभ मोरे आणि परिसरातील ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

फोटो- १४चिंचोडी रोड

===Photopath===

140621\14nsk_4_14062021_13.jpg

===Caption===

फोटो- १४चिंचोडी रोड 

Web Title: Sakade for repairing Chichondi-Badapur road