शेतकरी कर्जमाफीसाठी राज ठाकरे यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:30 IST2021-02-13T23:37:48+5:302021-02-14T00:30:32+5:30
येवला : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन साकडे घातले. यावेळी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

शेतकरी कर्जमाफीसाठी राज ठाकरे यांना साकडे
येवला : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन साकडे घातले. यावेळी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अस्मानी संकटातून सावरताना शेतकर्यांवर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा होत आहे, त्यात शासनाकडून व्याजासह दोन लाखापर्यंत असणारी कर्जाची रक्कम माफीसाठी ग्राह्य धरण्यात आल्याने ज्या शेतकर्यांचे कर्ज मुद्दल किंवा व्याजासह दोन लाखाच्या वर आहे अशा अनेक शेतकर्यांवर अन्याय झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मार्च महिना जवळ येत असल्याने बँका वसुलीसाठी दारात येऊन बसत आहे. शेतकर्यांना नोटिसा बजावत आहेत. महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी वीज खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. अस्मानी, सुलतानी संकटांन बेजार झालेल्या शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा असताना सरकारही दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष हितेश दाभाडे, महेश लासुरे, संदीप मखरे, प्रवीण खैरनार,गोकुळ लोहकरे, शंकर झाल्टे, रामभाऊ निकम, देवीदास पाटील, बहिरू झाल्टे, कैलास कदम आदींच्या स्वाक्षर्या आहेत.