मकरंदवाडीत वारकरी महोत्सवाची संतपूजनाने सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 13:02 IST2019-02-13T13:01:18+5:302019-02-13T13:02:15+5:30
देवळा : मकरंदवाडी ता. देवळा येथे श्रीगुरु गोरक्षनाथ संस्थानच्या रौप्यमहोत्सवी धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त झालेल्या वारकरी महोत्सवात संतपूजनाने व काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मकरंदवाडीत वारकरी महोत्सवाची संतपूजनाने सांगता
देवळा : मकरंदवाडी ता. देवळा येथे श्रीगुरु गोरक्षनाथ संस्थानच्या रौप्यमहोत्सवी धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त झालेल्या वारकरी महोत्सवात संतपूजनाने व काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. गेल्या सात दिवसांपासून नवनाथ ग्रंथ व ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायणासह रोज दुपारी बंडामहाराज कराडकर यांनी श्रीमदभागवत ग्रंथातील प्रवचने दिली. श्रीगोरोबाकाका महाराज संस्थान तेर येथील २०० वारकरी विद्यार्थी हरिपाठासह कीर्तनाला साथ देत होते. या वारकरी विद्यार्थ्यांची सारखी वेशभूषा, त्यांचा पदन्यास, गायन, वादन हे सगळेच भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. या कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली. शेवटच्या दिवशी श्रीसखाराममहाराज संस्थान अमळनेरचे श्रीप्रसाद महाराज, चैतन्यमहाराज देगलूरकर, बंडा महाराज कर्हाडकार व श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे भिकाजी अण्णा धोंडगे यांचा संतपूजन सोहळा संपन्न झाला. संत निवृत्तीनाथनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष संजय धोंडगे यांचे काल्याचे कीर्तन झाले. सप्ताहभर येथे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील बहुसंख्य भाविकांनी हजेरी लावत या महोत्सवाचा लाभ घेतला.