संत नामदेव महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:25 IST2018-11-20T18:23:56+5:302018-11-20T18:25:07+5:30

येथील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने प्रबोधिनी एकादशी व श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Saint Namdev Maharaj's birth anniversary | संत नामदेव महाराज जयंती उत्साहात

येवल्यात संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूजन करताना समाजबांधव.

येवला : येथील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने प्रबोधिनी एकादशी व श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त संत नामदेव विठ्ठल मंदिरात पहाटे काकड आरती होऊन नंदलाल भांबारे यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीला अभिषेक करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष अरविंद तुपसाखरे, सुहास भांबारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर महाआरती होऊन प्रसाद वाटपाने जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी मुकेश लचके, राजेंद्र गणोरे, कैलास बकरे, संतोष टिभे, ज्ञानेश टिभे, जानकीराम शिंदे, राजेंद्र वारे, गणेश लचके, सागर मोतीवाले, स्वप्निल खंदारे, तुषार भांबारे, श्याम गायकवाड, श्यामाबाई लचके, सुशीला लचके, सविता हाबडे, अरु णा सदावर्ते, सुशीला टिभे, छाया लचके, भारती टिभे, विजया टिभे, इंदूबाई सारंगधर उपस्थित होते.

Web Title: Saint Namdev Maharaj's birth anniversary