नांदूरवैद्य येथून साईबाबा पदयात्रेचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:18 IST2020-01-29T22:11:52+5:302020-01-30T00:18:44+5:30

साई मित्रमंडळाच्या वतीने आयोजित साईबाबा पालखी पदयात्रेचे बुधवारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. पदयात्रेचे हे नववे वर्ष आहे.

Saibaba Pedestrian departure from Nandurvadi | नांदूरवैद्य येथून साईबाबा पदयात्रेचे प्रस्थान

नांदूरवैद्य येथून शिर्डीकडे निघालेल्या साई पालखी पदयात्रेत सहभागी भाविक.

नांदूरवैद्य : येथील साई मित्रमंडळाच्या वतीने आयोजित साईबाबा पालखी पदयात्रेचे बुधवारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. पदयात्रेचे हे नववे वर्ष आहे.
पदयात्रेत साधारणत: दीडशे साईभक्त सहभागी झाले आहेत. पदयात्रा मार्गातील गावांतूनही भक्त पदयात्रेस सहभागी होणार असल्याचे साई समितीच्या वतीने सांगण्यात आले. सर्वप्रथम पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. भैरवनाथ मंदिरापासून पालखीचे ढोलताशाच्या गजरात शिर्डीकडे प्रस्थान झाले. मिरवणुकीत नृत्य करणाऱ्या अश्वांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. यावर्षी पदयात्रेत ५० ते ६० महिलांनी सहभाग नोंदवला आहे. साई पालखीला निरोप देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘ओम साईराम, साईबाबा की जय’च्या जयघोषात भाविकांनी प्रस्थान केले. पालखी ३१ जानेवारीला सायंकाळी शिर्डीत दाखल होणार आहे, अशी माहिती सुनील मुसळे, ज्ञानेश्वर काजळे, सुधाकर बोराडे, रवि मुसळे, देवीदास काजळे, शिवाजी काजळे यांनी दिली. नवनाथ कर्पे, डॉ. संदीप वायकोळे, दीपक जोशी, भाऊसाहेब मुसळे, गणेश मुसळ आदी विशेष मेहनत घेत आहेत.

Web Title: Saibaba Pedestrian departure from Nandurvadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.