पोहण्यासाठी गेलेल्या साईचा धरणात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 01:39 IST2022-04-30T01:39:02+5:302022-04-30T01:39:25+5:30

करंजवण येथील साई संदीप मोरे (१६) हा युवक शुक्रवारी करंजवण धरणात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना तो खोल पाण्यात गेल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे अडीस तासाने बुडालेल्या साईला बाहेर काढण्यात यश आले आहे.

Sai, who went for a swim, drowned in the dam | पोहण्यासाठी गेलेल्या साईचा धरणात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या साईचा धरणात बुडून मृत्यू

दिंडोरी : करंजवण येथील साई संदीप मोरे (१६) हा युवक शुक्रवारी करंजवण धरणात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना तो खोल पाण्यात गेल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे अडीस तासाने बुडालेल्या साईला बाहेर काढण्यात यश आले आहे.

जेव्हा साई धरणात पोहण्यासाठी उतरला तेव्हा आजूबाजूच्या अनेक ठिकाणचे युवक पोहण्यासाठी आले होते. ते सर्वजण पोहण्यामध्ये दंग असल्यामुळे साई पाण्यात बुडत असल्याचे लगेच कळले नाही. साईने यंदा इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. या घटनेमुळे करंजवणसह आजूबाजूच्या गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Sai, who went for a swim, drowned in the dam