पिंपळगाव येथून साई पालखी शिर्डीकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:00 IST2019-01-07T17:00:35+5:302019-01-07T17:00:53+5:30
पिंपळगाव बसवंत : शहराची मानाची पालखी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जय बाबाजी साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्तान झाले. भास्कर बनकर यांच्या हस्ते पालखी पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी रामराव डेरे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढून पालखीला निरोप देण्यात आला.

पिंपळगाव येथून साई पालखी शिर्डीकडे रवाना
पिंपळगाव बसवंत : शहराची मानाची पालखी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जय बाबाजी साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्तान झाले. भास्कर बनकर यांच्या हस्ते पालखी पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी रामराव डेरे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढून पालखीला निरोप देण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव शिंदे, चंदू पाटील, रमेश गायकवाड, लहू गवळी, विजय धूम आदी उपस्थित होते. साईबाबांची पालखी मिरवणूक व पारंपरिक वाद्यांच्या गजरातीने परिसर दुमदुमून गेला होता. या पालखीचे यंदाचे सहावे वर्ष आहे. अंबिकानगर, महादेववाडी परिसर भक्तिमय वातावरणात जळून गेला होता. या पालखी सोहळ्यासाठी मोतीराम पवार, मनोज शेवरे, संजय विधाते, दत्तू झनकर, विश्वनाथ खराटे, संजय गवळी, दिलीप पीठे, विलास पवार, संजय वेरु ळे, अक्षय विधाते, शरद शेखरे, कांतिलाल शेखरे, रमेश पीठे, नाना कुमावत, अनिल घुले, ज्ञानेश्वर जाधव, हरिश्चंद्र खराटे, संजय बनकर, गणेश पवार, राजेंद्र लिंबोळे, लक्ष्मण पवार आदींसह साईभक्त सहभागी झाले आहेत.