शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

साई पालख्यांनी सिन्नर-शिर्डी मार्ग फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:11 IST

सिन्नर : रामनवमीच्या उत्सवासाठी मुंबई उपनगरातून हजारो साईभक्त शिर्डीच्या दिशेने कूच करीत आहेत. ‘ॐ साई राम’ च्या जयघोषात सिन्नर-शिर्डी रस्ता साईभक्तांनी अक्षरश: फुलला आहे. गुरुवारी व शुक्रवारी सिन्नर व वावी येथे आलेल्या अनेक साई पालख्यांचे व हजारो साईभक्तांचे वावीकरांनी जोरदार स्वागत करून त्यांची व्यवस्था ठेवली. वावी येथील साई पालखी सेवा ...

सिन्नर : रामनवमीच्या उत्सवासाठी मुंबई उपनगरातून हजारो साईभक्त शिर्डीच्या दिशेने कूच करीत आहेत. ‘ॐ साई राम’ च्या जयघोषात सिन्नर-शिर्डी रस्ता साईभक्तांनी अक्षरश: फुलला आहे. गुरुवारी व शुक्रवारी सिन्नर व वावी येथे आलेल्या अनेक साई पालख्यांचे व हजारो साईभक्तांचे वावीकरांनी जोरदार स्वागत करून त्यांची व्यवस्था ठेवली. वावी येथील साई पालखी सेवा संस्थानच्या वतीने पदयात्रेत सहभागी झालेल्या हजारों साईभक्तांच्या अल्पोपाहार, भोजन व औषधोपचाराची व्यवस्था ठेवण्यात आली होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेकडो साई पालख्या रामनवमीच्या उत्सवासाठी शिर्डीला जातात. या साई पालख्यांचे येथे बुधवारपासून आगमन होण्यास सुरुवात झाली. हजारो साईभक्तांमुळे सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वाहतुकीस अडचण निर्माण होत होती. साईभक्तांचे उन्हापासून संरक्षण होऊन त्यांना सावली व आराम मिळावा यासाठी सिन्नर-शिर्डी रस्त्यावर ठिकठिकाणी शामियाना उभारण्यात आला आहे. हजारो साईभक्तांमुळे सिन्नर-शिर्डी रस्ता ओम साई रामच्या निनादात दुमदुमून गेला होता. साईभक्तांच्या गर्दीमुळे वावी गावास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गुरुवारी वावी येथे साईसेवक (दादर), साईलीला (लालबाग), साईचरण, साई नंदादीप, साई युवा मित्रमंडळ (अंधेरी) आदींसह अनेक दिंंड्यांचे येथे आगमन झाले.  या सर्व दिंंड्यांमध्ये सहभागी झालेल्या हजारो साईभक्तांच्या अल्पोपाहाराची व्यवस्थायेथील साई पालखी सेवा संस्थानतर्फे करण्यात आली होती. साई सेवकसह अनेक आलेल्या दिंंड्यांचे महेश अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, रेखा अग्रवाल, उमेश म्हात्रे, भगवानभाई पटेल, अजय उनडकट, कन्हैयालाल भुतडा, जगदीश पटेल, सोमनाथ आनप, कृष्णकांत रुइया, उमंग शहा, अरविंद चौधरी, जगद गोलचा, जयेश मालपाणी, भरत आनप, पवन भाऊवाला, शाम सराफ, सुरेश मुळीक, पवन अग्रवाल, राजकुमारी अग्रवाल, गीता ठाकूर, उमा गुप्ता, सुनीता अग्रवाल, सरला भुतडा, सविता पटेल, मंगला ओझा आदींसह संस्थानच्या सदस्यांनी साई पालख्यांची व्यवस्था ठेवली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत साई पालख्यांचे आगमन सुरूच होते. यामुळे साईभक्त निवासला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. साईभक्तांनी तेथे उभारण्यात आलेल्या शामियान्याखाली विश्रांती घेतल्यानंतर शिर्डीच्या दिशेने प्रस्थान केले. लालबाग येथील साई लीला मंडळाचे गुरुवारी सायंकाळी वावी गावात आगमन झाले. सुमारे दीड हजार साईभक्तांचे पालखीसह येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. वावीकरांनी व साई पालखी सेवा संस्थानतर्फे साईभक्तांचे उत्स्फूर्त स्वागत झाल्यानंतर पालख्यांनी शिर्डीच्या दिशेने कूच केली. दरवर्षी साईभक्तांना सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी व वावी शिवारात आल्यानंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी फारशी पाणीटंचाई जाणवली नाही. रविवारी (दि. २५) रामनवमी असल्याने पायी जाणारे हजारो साईभक्त शिर्डीच्या दिशेने कूच करीत आहेत.सिन्नर येथे पटेल सोशल गु्रपकडून साई पालख्यांचे स्वागतगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई व उपनगरातून निघालेल्या हजारो साईभक्तांचे व पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते. सिन्नर येथील पटेल सोशल गु्रपच्या वतीने प्रत्येक पालखीतील साईभक्तांसाठी थंडपेय, चहापाणी व कलिंगडची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी येणाऱ्या पायी दिंड्यांसाठी अल्पोपाहार देण्यात येत होते. मगनभाई पटेल, कांतीभाई पटेल, देवजीभाई पटेल, गोविंदभाई पटेल, सतीश पटेल, नितीन पटेल, मनोज पटेल, लधाराम पटेल, मोहन पटेल, महेंद्र पटेल, दीपक पटेल, राजूभाई पटेल, मुकेशभाई पटेल, परधभाई पटेल, रमेश पटेल, जगदीश पटेल, सविता पटेल, दुर्गा पटेल, जयाबेन पटेल, नीताबेन पटेल, रसिलाबेन पटेल, लक्ष्मीबेन पटेल, स्रेहा पटेल, सूजन पटेल, प्रफुल्ल पटेल यांनी दिंड्यांचे स्वागत केले.अंधेरी येथील साई युवा मित्र मंडळातील २०० साईभक्त मुक्कामासाठी कर्पे वस्तीवर होते. या साईभक्तांच्या अन्नदानाची व्यवस्था रामनाथ कर्पे यांनी केली होती. प्रशांत कर्पे यांच्या हस्ते साई पालखीचे पूजन व स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या कडेला असणाºया हॉटेल व्यावसायिकांचा धंदा यामुळे तेजीत होता.सराफ व्यावसायिक शिवाजी माळवे, रंजना माळवे, आशिष माळवे, चैताली माळवे यांच्या हस्ते साई पालखीचे पूजन करण्यात आले. पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. साईलीला पालखीचा मुक्काम येथील प्राथमिक शाळेत झाला. शिवाजी माळवे यांच्यातर्फे साईलीला दिंडीच्या भोजनाची व्यवस्था ठेवण्यात आली होती. साईभक्तांनी आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. यात झुणका-भाकर, मिरचीचा ठेचा व लापशी या मेनूचा मुंबईकर साईभक्तांनी मोठ्या आनंदाने आस्वाद घेतला.

टॅग्स :Nashikनाशिकsaibabaसाईबाबा