साई ब्रह्मनाद मंचाचा मलेशियात स्वरनाद
By Admin | Updated: August 23, 2015 22:48 IST2015-08-23T22:47:42+5:302015-08-23T22:48:12+5:30
साई ब्रह्मनाद मंचाचा मलेशियात स्वरनाद

साई ब्रह्मनाद मंचाचा मलेशियात स्वरनाद
येवला : येथील साई ब्रह्मनाद स्वरमंचास मलेशियात साईभक्तीपर गीते सादर करण्याची संधी लाभली आहे. मलेशियातील साईभक्तांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मलेशियात एकूण २६ साईबाबा केंद्रे आहेत. या मंदिरात येवल्यातील साईभक्त भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत.
मलेशियामधील साईबाबा सोसायटी आॅफ मलेशियाचे चेअरमन एस.पी. कन्नन यांनी या मंचाला निमंत्रित केल्याने हे कलावंत मलेशियाला रवाना झाले आहेत. येत्या ३ सप्टेंबरपर्यंत मलेशियात त्याचे सलग १५ दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये साईभजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्रुतिकंकण संगीत विद्यालयाचे संस्थापक प्राचार्य रवींद्र पिंगळे यांनी दिली.
एस.पी. कन्नन हे २५ वर्षांपासून मलेशियामधील अनेक साईभक्तांना दरवर्षी शिर्डी येथे साईदर्शनासाठी घेऊन येत असतात. अनेक साईभक्त या सुविधेचा लाभ घेत आहेत. साई ब्रह्मनाद स्वरमंचाचे कलाकार संकेत दरकदार, नीलिमा खानापुरे (गायक), नकुल मोहन भगत (तबला), पंकज पाखले, पराग पाखल (सिंथेसायझर), (गायक) हे सर्व कलाकार प्रा. रवींद्र पिंगळे यांच्याकडे १४ वर्षांपासून संगीत शिक्षण घेत आहेत. सर्व कलाकार हे संगीत विशारद तसेच एम.ए.संगीत या परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे आयोजित कार्यक्रमात ३० आॅगस्ट रोजी यू.के.तील साईबाबा आॅर्गनायझेशन यांच्यातर्फे आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय अखंड भजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भारताचे प्रतिनिधित्व शिर्डीचे साई ब्रह्मनाद स्वरमंचास सलग दुसऱ्या वर्षी सलग ४ तास भजनसेवेची संधी मिळाली असल्याची माहिती रवींद्र पिंगळे यांनी दिली.
तसेच अखंड भजन कार्यक्रमात मलेशिया, भारत, जर्मनी, सिंगापूर, यू.के. व आॅस्ट्रिया हे देश सहभागी होणार असून साई स्वरनाद मंच व इतर देशाची भजन जुगलबंदी हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्र माचा सर्व आर्थिक भार मलेशियातील साईभक्तांनी केला आहे. (वार्ताहर)