राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी सागर कुंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 16:37 IST2020-10-17T16:36:02+5:302020-10-17T16:37:46+5:30
निफाड : येथील सागर कुंदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली.

सागर कुंदे यांना नियुक्तीपत्र देताना आमदार दिलीप बनकर सोबत सिद्धार्थ वनारसे, गणेश बनकर, भूषण धनवटे, मयूर काळे, तुषार सानप, ईश्वर धारराव, राहुल सानप, अझर राजे, प्रतिक वाढवणे, सचिन जाधव आदी.
ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी नियुक्ती पत्राद्वारे कुंदे यांची ही निवड केली.
मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी नियुक्ती पत्राद्वारे कुंदे यांची ही निवड केली. ते गेली ६ वर्ष राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रदेश सरचिटणीपदी काम पाहिले आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते सागर कुंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी जि. प सदस्य सिद्धार्थ वनारसे, ग्रा. प. सदस्य गणेश बनकर, भूषण धनवटे, मयूर काळे, तुषार सानप, ईश्वर धारराव, राहुल सानप, अझर राजे, प्रतिक वाढवणे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.