साध्वी त्रिकालभवंता यांना स्नानासाठी वेळ देण्यास हरकत नाही : महंत हरिगिरीजी
By Admin | Updated: July 18, 2015 23:01 IST2015-07-18T23:00:36+5:302015-07-18T23:01:11+5:30
साध्वी त्रिकालभवंता यांना स्नानासाठी वेळ देण्यास हरकत नाही : महंत हरिगिरीजी

साध्वी त्रिकालभवंता यांना स्नानासाठी वेळ देण्यास हरकत नाही : महंत हरिगिरीजी
त्र्यंबकेश्वर : येथील सर्व दहा आखाड्यांच्या शाहीस्नानानंतर भाविकांच्या स्नानाच्यावेळी प्रशासनने साध्वी त्रिकालभवंता यांना स्नानासाठी वेळ दिल्यास त्यास आमची हरकत नाही, असे मत जुना आखाड्याचे राष्ट्रीय संरक्षक महंत श्रीहरिगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
त्रिकालभवंता सरस्वती यांनी त्र्यंबकेश्वरला स्नानासाठी वेळ मागितल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, सात नागा संन्यासी, त्यानंतर राखीव वेळ व त्यानंतर दोन उदासीन बडा व नया आणि त्यानंतर निर्मल आखाडे असे स्नानाचे क्रम आहेत. या सर्व वेळा साधारणत: १७०० सालापासून निश्चित केल्या आहेत. या राखीव वेळेत इतरांनी स्नान करणे ही बाब प्रशासनाच्या मर्जीवर आहे. भाविकांच्या वेळेत त्यांनी स्नान केले तर हरकत नाही; मात्र प्रशासनाला बंदोबस्त ठेवावाच लागेल. कारण त्रिकालभवंता कोणत्याही आखाड्याच्या संबंधित नाहीत. सिंहस्थ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर-नाशिकला पहाटेपासून पूजा होऊन सकाळी ६.४० ला ध्वजारोहण करण्यात आले. मग कावनईला दि. १६ जुलैला ध्वजारोहण कसे करण्यात आले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ कावनईला सिंहस्थाचे मूळ ठिकाण असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे ते म्हणाले़
देशात केवळ चारच ठिकाणी कुंभमेळा होत असतो. आता तर अनेक ठिकाणी कुंभमेळा असल्याच्या बातम्या प्रस्तुत केल्या जात आहेत. हे योग्य नाही. प्रशासनानेदेखील अशा नवीन प्रथांना-परंपरांना खतपाणी देऊ नये. असे त्यांनी सांगितले़(वार्ताहर)