जिल्हा रुग्णालयात साधू-महंतांची धाव
By Admin | Updated: September 1, 2015 23:45 IST2015-09-01T23:44:28+5:302015-09-01T23:45:06+5:30
मनपा रुग्णालयात उपचार मिळत नसल्याची तक्रारव

जिल्हा रुग्णालयात साधू-महंतांची धाव
नाशिक : महापालिकेतर्फे साधुग्राममध्ये तयार करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नसल्याची तक्रार काही साधूंनी केली आहे़ दरम्यान, या साधूंना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे़ दरम्यान, साधुग्राममधील साधू उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी सांगितले आहे़
साधुग्राममध्ये विविध राज्यांतून आलेले साधू-महंत वा भाविक आजारी पडल्यास त्यांना तत्काळ आरोग्यसुविधा मिळावी यासाठी महापालिकेने सुमारे शंभर बेडचे तात्पुरते रुग्णालय सुरू केले आहे़ तसेच या ठिकाणी डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे़ मात्र या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी तपासणी न करता केवळ गोळ्या देतात, इंजेक्शन अथवा सलाईन देत नसल्याची तक्रार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या साधूंनी केली आहे़
साधुग्राममध्ये सेवा देण्यासाठी आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) तयार असून, महापालिकेला प्रसंगी त्यांची सेवा घेणे शक्य आहे़ यामुळे साधूंना साधुग्राममध्येच चांगले उपचार मिळणे शक्य होईल़