सदानंद मोरे यांची सिन्नर वाचनालयास भेट
By Admin | Updated: February 13, 2015 23:53 IST2015-02-13T23:53:03+5:302015-02-13T23:53:03+5:30
सदानंद मोरे यांची सिन्नर वाचनालयास भेट

सदानंद मोरे यांची सिन्नर वाचनालयास भेट
सिन्नर : ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी दुपारी सिन्नर सार्वजनिक वाचनालयास भेट दिली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्यासह संचालक मंडळाने त्यांचे स्वागत केले.
मोरे नाशिक येथे जात असताना वाचनालयाचे अध्यक्ष भगत यांनी त्यांना वाचनालयात थांबण्याची विनंती केली होती. दुपारी मोरे यांचे वाचनालयात आगमन झाले. वाचनालयाची अभ्यासिका, सभागृह, ग्रंथालय पाहून मोरे यांनी समाधान व्यक्त केले. सिन्नरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी वाचनालयाने केलेली प्रगती पाहून त्यांनी संचालक मंडळास कौतुकाची थाप दिली. भगत यांनी सिन्नर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहाची माहिती देताना विविध उपक्रम सांगितले. वाचनालयाच्या एखाद्या कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचे निमंत्रण भगत यांनी यावेळी दिले. सिन्नर वाचनालयात पुन्हा येण्यास आनंद होईल, असे उद्गार मोरे यांनी यावेळी काढले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हेमंत वाजे, सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव काळे, लियाकत सय्यद, संजय सानप, रामदास बोऱ्हाडे, अजय शिंदे, संचालक पी. एल. देशपांडे, मनीष गुजराथी, विलास पाटील, सागर गुजर, जितेंद्र जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)