नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव टळला असला तरी त्यांच्या विषयीची खदखद कमी झाली नसून शनिवारी (दि.१५) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समक्षच हा असंतोष बाहेर पडला. आयुक्त तुकाराम मुंढे कोणालाही विश्वासात घेत नाहीत, बससेवा आणि अन्य प्रस्ताव कोणालाही विश्वासात न घेता मांडले जातात अशा तक्रारी करतानाच पक्षाचे नुकसान झाले, तर पुन्हा सांगू नका असा सूर लावतानाच एका नगरसेवकाने तर महापालिकाच बरखास्त करा, म्हणजे आम्ही आमचे काम धंद्यात लक्ष घालू, असा निर्वाणीचा इशाराही दिल्याचे वृत्त आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री गिरीश महाजन शनिवारी (दि. १५) सकाळी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर आले होते. यावेळी महाजन यांच्यासमोरच आमदार आणि नगरसेवकांच्या भावनांचा उद्रेक झाला. महाजन यांच्या आगमन झाल्यानंतर चर्चा करताना आमदार देवयानी फरांदे यांनी शहरात स्मार्ट सिटीची चांगली कामे होत असल्याचे सांगतानाच आमदार बाळासाहेब सानप संतप्त झाले व त्यांनी शहरात कोणते चांगले काम सुरू आहे, असा प्रश्न करताना नगरसेवकांना विश्वासात न घेता बससेवेसारखे प्रस्ताव मांडले जातात. स्मार्ट सिटीचे प्रस्ताव मांडले खरे परंतु शहराच्या एका भागात विकास करण्यासाठी संपूर्ण शहरवासीयांना आणि विशेष करून शेतकऱ्यांवर करवाढीचा बोजा कशासाठी? असा प्रश्न केला.कॉँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता असेल तेथे बदली कराभाजपाच्या एका कार्यकर्त्याने तर कमालच केली. कॉँग्रेस आणि राष्टÑवादीची सत्ता असेल त्या ठिकाणी तुकाराम मुंढे यांची बदली करा, अशी सूचना केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांना ही सूचना केल्यानंतर त्यांनी त्या कार्यकर्त्याला आता तूच सांगायचा बाकी राहिला होता, असे सुनावल्याचे उपस्थितांनी सांगितले.
नाशिक महापालिकाच बरखास्त करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:54 IST
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव टळला असला तरी त्यांच्या विषयीची खदखद कमी झाली नसून शनिवारी (दि.१५) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समक्षच हा असंतोष बाहेर पडला.
नाशिक महापालिकाच बरखास्त करा !
ठळक मुद्देमुंढे यांच्यावर भाजपा संतप्त महाजन यांच्यासमोरच तक्रारींचा पाढा