Saburi's advice to BJP runner Kavita Raut | धावपटू कविता राऊतला भाजपकडून सबुरीचा सल्ला

धावपटू कविता राऊतला भाजपकडून सबुरीचा सल्ला

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी सेनेत प्रवेश करीत आपला मतदारसंघ निश्चित केल्यानंतर त्यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी कॉँग्रेसने धावपटू कविता राऊतची मनधरणी करीत कॉँग्रेसकडून लढण्याबाबतची गळ घातली होती. मात्र राजकीय प्रवेशाबाबत आपला कोणताही निर्णय झाला नसल्याचे वारंवार सांगणाऱ्या कविता राऊत हिने मुंबईत काही भाजप नेत्यांची भेट घेतल्याने कविताच्याही राजकीय आशा पल्लवित झाल्याचे मानले जाते आहे. विशेष म्हणजे भाजपकडून कोणताही शब्द मिळाला नाहीच उलट तिला सबुरीचा सल्ला देण्यात आला असल्याचे वृत्त आहे. स्थानिक भाजप नेते मात्र कविताच्या नावाचे राजकीय भांडवल करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार-संघातून सलग दोनदा आमदार झालेल्या निर्मला गावित यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेच्या बळावर हॅट््ट्रिकची तयारी चालविली आहे. मतदारसंघ कॉँग्रेसला अनुकूल असतानाही गावित यांनी सेनाप्रवेश केल्याने मतदारसंघातील तसेच तालुक्यातील कॉँग्रेस नेत्यांनी कार्यकर्ते मात्र कॉँग्रेसमध्येच असल्याचे सांगून गावित यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी धावपटू कविता राऊत हिच्याशी प्राथमिक चर्चा करून काँग्रेसकडून लढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. कॉँग्रेसच्या सुरगाणा येथील एका कार्यक्रमासाठीदेखील कविताला आमंत्रण देण्यात आले होेते. कविताने काँग्रेस नेत्यांना कोणताही शब्द दिला नाही, मात्र कविताला बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त करून निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याचे दाखवून दिले होते. कविताच्या या भूमिकेमुळे कॉँग्रेस नेते बॅकफूटवर गेले असतानाच काही दिवसांपूर्वीच कविता राऊत मुंबईत भाजपाचे नेते आशिष शेलार यांना भेटल्याचे वृत्त आहे. एकीकडे निवडणूक लढविण्याविषयी उत्सुकता नसल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे भाजपचा दरवाजा ठोठावल्यामुळे कविताच्या राजकीय आकांक्षा पल्लवित झाल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे. भाजपकडून कोणतेही बोलावणे आलेले नसतानाही भाजप नेत्यांची त्यांनी स्वत: घेतलेली भेट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
असून, भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडूनच याबाबतची माहिती अधिकाधिक पसरविली जात आहे. भाजपा नेते शेलार यांच्याशी झालेल्या चर्चेत कविता राऊत हिला कोणताही शब्द मिळाला नसून उलट सबुरीचा सल्ला देण्यात आल्याचे समजते.
कॉँग्रेसमध्ये न जाण्याचा सल्ला?
कॉँग्रेसकडून कविता राऊतला निवडणुकीसाठी विचारण्यात आल्यानंतर कविताला बिनविरोध निवडून देण्याबाबतचा प्रस्ताव तिच्या कुटुंबीयांनी काँग्रेसपुढे ठेवला होता. त्यानंतर भाजपने त्यांना भेटून पुन्हा याच मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी भाजप नेत्यांनी निवडणुकीत विरोधात कुणीतरी उभे राहतच असते, असे सांगून कोणताही शब्द दिला नाही, मात्र काँग्रेसमध्ये न जाण्याचा सल्ला दिल्याचे समजते.

Web Title:  Saburi's advice to BJP runner Kavita Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.