S. G. Supplemental feed allocation to school students | एस. जी. स्कूलच्या विद्यार्थ्यांना पूरक आहार वाटप
एस. जी. स्कूलच्या विद्यार्थ्यांना पूरक आहार वाटप

सिन्नर : माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एस जी पब्लिक स्कूलमध्ये माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत पूरक आहार म्हणून उकडलेली अंडी वाटप करण्यात आली.
अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिज, लोह, त्याचबरोबर झिंक व आयोडीन आदी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांना दररोज अंडी खावी असे मत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष दौलतराव मोगल यांनी व्यक्त केले. येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचिलत एस जी पब्लिक स्कुलमधील माध्यमिक विभागात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत पूरक म्हणून उकडलेली अंडी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाने पोषण आहारात अंडी, खजूर, राजगिरा लाडू, स्थानिक उपलब्ध फळे आदींचा समावेश केला असून शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी विद्यालयात उत्त्तमरीत्या केली जात असल्याने समाधान त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांसाठी भात, तूरडाळ वरण, मुगडाळ खिचडी, मुगडाळ वरण, हरभरा उसळ, हरभरा खिचडी, मटकी उसळ आदींचा पोषण आहारात समावेश केला जात आहे त्याचबरोबर पूरक आहार म्हणून यापुढे अंडी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे यांनी दिली.


Web Title: S. G. Supplemental feed allocation to school students
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.