शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

बंदीवानांना भेटणाऱ्या नातेवाइकांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:13 PM

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना दिवाळी सणामुळे नातेवाईक कारागृहास भेटण्यासाठी येत असल्याने मोठी गर्दी होत आहे. नातेवाइकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने कैद्यांना नातेवाइकांशी दूरध्वनीवरून (कॉइन बॉक्स) बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून बोलण्याचा कालावधी पाच मिनिटां ऐवजी दहा मिनिटांचा केला आहे. यामुळे कारागृहात कैद्याला भेटण्यास येणाºया नातेवाइकांची गर्दी कमी होऊ लागली आहे.

ठळक मुद्देदूरध्वनीची सुविधा : भेटण्याचा कालावधी वाढविला

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना दिवाळी सणामुळे नातेवाईक कारागृहास भेटण्यासाठी येत असल्याने मोठी गर्दी होत आहे. नातेवाइकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने कैद्यांना नातेवाइकांशी दूरध्वनीवरून (कॉइन बॉक्स) बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून बोलण्याचा कालावधी पाच मिनिटां ऐवजी दहा मिनिटांचा केला आहे. यामुळे कारागृहात कैद्याला भेटण्यास येणाºया नातेवाइकांची गर्दी कमी होऊ लागली आहे.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ३३०० हून अधिक कैदी असून त्यांना भेटण्यासाठी येणाºया नातेवाइकांना नियमानुसारच भेट घ्यावी लागते. ज्या कैद्यांची न्यायालयत सुनावणी सुरू आहे, खटल्याचा निकाल लागलेला नसल्याने कच्चे कैदी म्हणून ओळखले जातात. कच्च्या कैद्यांना दूरध्वनीवरून नातेवाइकांशी बोलण्याची सुविधा देण्यात येत नाही. त्यांना आठवड्यातून एकदाच नातेवाइकांना भेटता येते. शिक्षा झालेले पक्क्या कैद्यांना त्यांचे नातेवाईक महिन्यातून दोनदा भेटू शकतात. दिवाळी सणामुळे कैद्यांना कुटुंबीयांची आठवण व ओढ लागलेली असते. तशीच परिस्थिती त्यांच्या कुटुंबीयांची असते. नातेवाईक भेटायला आले नाही तर कैदी खचतो, आजारी पडतो. या बाबी लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने पक्क्या कैद्यांना कॉइन बॉक्सवरून नातेवाइकांशी बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिन्यातून एकदाच नातेवाइकांशी पाच मिनिटे बोलण्याची असलेली मर्यादा प्रशासनाने वाढवून दहा मिनिटांपर्यंत करून दिली आहे. यामुळे कैदी व त्याच्या नातेवाइकांचे बोलणे सहजरीत्या होत असल्याने कारागृहात भेटायला येणाºया नातेवाइकांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नातेवाइकांना येण्या-जाण्यासाठी होणारा खर्च, दगदग आदि सर्व बाबींतून सुटका झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकjailतुरुंग