शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांना ऑनलाइन शिक्षणाची घाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:10 IST

शहरातील विविध खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांना  घाई झाली असून,  शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती संबंधित शाळांकडून केली जात आहे. 

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक वर्षांचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यासाठी शाळांची घाई शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती

नाशिक : जुलैपासून ऑनलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभाग विचार करत असले तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून सूट देण्यात येणार असल्याचे स्पष्ट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, शहरातील विविध खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांना  घाई झाली असून,  शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती संबंधित शाळांकडून केली जात आहे. शहरातील इंग्रजी माध्यमांच्या काही खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहे. या वर्गांत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक करण्यात येत असून, पालकांना विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके व गणवेश संबंधित शाळांकडून घेण्यास सांगितले जात आहे.  शाळा सुरू करण्याविषयी स्पष्ट सूचना नसताना शाळांकडून अशाप्रकारे गणवेश व पाठ्यपुस्तकांची सक्ती का करण्यात येत असल्याने पालकही संभ्रमात आहेत.  दरम्यान, शिक्षण विभाग आॅनलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात विचार करत असला तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून सूट देण्यासोबतच केवळ नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने शासकीय शाळा अजूनही शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र काही खासगी संस्थांकडून ऑनलाइन माध्यमातून पूर्व प्राथमिकच्या नर्सरीसह, जुनियर व सिनियर केजी वर्गांसह पहिली, दुसरीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात घाई सुरू झाली आहे. पूर्व प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान किंवा मदत मिळत नाही. त्यांचे आर्थिक समीकरण विद्यार्थ्यांच्या शुल्कावरच अवलंबून असते. जितके अधिक विद्यार्थी तेवढेच अधिक उत्पन्न असे समीकरण बनले आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावू नये यासाठी ऑनलाइन शिक्षणप्रणालीतून शाळांकडून धडपड सुरू आहे. यातूनच विद्यार्थ्यांचा पट वाढविण्याची स्पर्धा निर्माण झाली असून, गतवर्षात पालकांसोबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप गु्रपच्या माध्यमातून झूम, गुगल मीटसारख्या अ‍ॅपच्या लिंक शेअर करून विविध शाळांनी नवीन शैक्षणिक वर्षांचे वर्ग सुरू करण्याची घाई सुरू केली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी